औरंगाबाद- शहरातील एमजीएम महाविद्यालयात फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा वसतिगृहातच खुन झाला, दोन दिवस झाले तरी पोलिसांना या प्रकरणाच धागेदोरे लागले नाहीत. शुक्रवारी(ता.१४) झुंजार छावा संघटनेच्या वतीने एमजीएम संस्थेच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आकाक्षांचा खुन एमजीएम प्रशासनानेच केला असल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे.
आकांक्षा
ही एमजीएम फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स ऑफ फिजिओथेरफी प्रथम वर्षाची
विद्यार्थिनी होती. एमजीएम कॅम्पसमधील गंगा मुलींच्या वसतिगृहात ती राहत होती. ११ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ ते
पावणे दहा वाजेच्या सुमारास आकांक्षा तिच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती.
तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या. ही माहिती पोलिसांना न कळविता उपस्थितांनी
लगेच आकांक्षाला एमजीएममधील अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी आकांक्षाला
तपासून मृत घोषित केले. अखेर शवविच्छेदनातील प्राथमिक अहवालानुसार पोलिसांनी
खुनाचा गुन्हा नोंदवुन तपासाला सुरूवात केली. ४८ तास उलटुन ही
पोलिसांना या प्रकरणात धागेदोरे सापडले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाना उधान
आले आहे.
शुक्रवारी(ता.१४) झुंजार
छावा संघटनेच्या वतीने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात
वसतिगृहातील ७२ तासाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुण एमजीएम प्रशासनाने काही
छेडछाड केली आहे का, हे पोलिसांनी तपासावे. तसेच आकांक्षाच्या खुनाला एमजीएम
प्रशासनच जबाबदार आहे. या आधी देखील एमजीएममध्ये अनेक गैरप्रकार झाले आहेत यामुळे एमजीएम
संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा याविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा झुंजार छावा संघटनेने दिला आहे.












